स्वच्छ शरीर
एकांत जागेत.
झाकावे डोळे
सुखासनात.
समतोल श्वास
ओंकाराचा ध्यास.
सोडावे चिंतेस
विसरावे देहास.
करावे संथ
विचारांचे मंथन
आत्मनिरिक्षण
देवाचे चिंतन.
नियमित व्यायाम
सात्विक आहार.
रागावर संयम
करी निरोगी शरीर.
ह्रदय भावुक
संतुलित मन.
करी सार्थक
प्रेमळ जीवन.
द्वेषाचा त्याग
गुरूंचा संयोग.
होईल साध्य
ध्यानाचा योग.
दीपक वाईकर
To visit my profile on orkut click here
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment